भाजप जिल्हा सचिव दत्ताभाऊ खेमनर यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न!

श्रीरामपूरमध्ये खळबळजनक घडामोड! 'मुल्ला कटर' प्रकरणातील बलात्कार पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे सरसावलेल्या भाजप उत्तर नगर जिल्हा सचिव दत्ताभाऊ खेमनर यांच्यावर बुधवारी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला

🔴
 भाजप जिल्हा सचिव दत्ताभाऊ खेमनर यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न!

श्रीरामपूरमध्ये खळबळजनक घडामोड! ‘मुल्ला कटर’ प्रकरणातील बलात्कार पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे सरसावलेल्या भाजप उत्तर नगर जिल्हा सचिव दत्ताभाऊ खेमनर यांच्यावर बुधवारी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेने शहरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

📍 घटना कशी घडली?
बेलापूर रोडवरील कार वॉश सेंटरवर खेमनर गाडी धुत असताना, सात ते आठ अज्ञात हल्लेखोर मोटारसायकलवरून आले आणि बेसबॉलच्या बॅटने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण खेमनर यांनी प्रसंगावधान राखून स्वतःचा जीव वाचवला. गर्दी जमल्याने हल्लेखोर तातडीने पळून गेले.

💥 कोण आहे संशयित?
या हल्ल्याचा आरोप प्रकाश चित्ते याच्यावर करण्यात आला आहे. खेमनर यांनी याआधीच चित्ते याच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिलं होतं. त्यामुळेच चित्तेने राग मनात धरून हल्ल्याचा कट रचला, असा खेमनर यांचा आरोप आहे.

🗣️ खेमनर म्हणाले:

“माझ्यावर दोन दिवसांपासून नजर ठेवली जात होती. आज मला एकटं पाहून हल्ला घडवून आणण्यात आला. प्रकाश चित्ते विरोधात अ‍ॅट्रॉसिटी व इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो सध्या फरार आहे.”

🚨 राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया:
या हल्ल्यानंतर भाजपा नेते दीपक पटारे, मनोज भिसे, अभिजित लिप्टे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि खेमनर यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. तसेच चित्ते व त्याच्या टोळीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

⚠️ शहरात सावकारी, जमीन बळकावणे, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या टोळ्या आणि आता राजकीय नेत्यांवर हल्ले – श्रीरामपूरच्या कायदा-सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे!