व्यक्तिमत्त्व विकासासाठी संभाषण कौशल्य गरजेचे – अरुण वाबळे यांचा संदेश
शिर्डी येथील संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये पार पडलेल्या 'विद्यार्थी परिषद शपथविधी' सोहळ्यात विद्यार्थ्यांनी प्रभावी संवादकौशल्य सादर करून साऱ्यांना थक्क केलं. इंग्रजीत सादर झालेल्या ‘Youth Speaks: Voice of Change’ या टॉक शोमध्ये त्यांनी फिनलंड, जपान आणि भारतातील शिक्षण प्रणालींचं अचूक विश्लेषण करत उपस्थितांची वाहवा मिळवली.


शिर्डी येथील संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये पार पडलेल्या ‘विद्यार्थी परिषद शपथविधी’ सोहळ्यात विद्यार्थ्यांनी प्रभावी संवादकौशल्य सादर करून साऱ्यांना थक्क केलं. इंग्रजीत सादर झालेल्या ‘Youth Speaks: Voice of Change’ या टॉक शोमध्ये त्यांनी फिनलंड, जपान आणि भारतातील शिक्षण प्रणालींचं अचूक विश्लेषण करत उपस्थितांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अरुण वाबळे (माजी संचालक – सिटी बँक, दक्षिण आशिया) यांनी विद्यार्थ्यांच्या संवादशैलीचं कौतुक करताना सांगितलं, “चांगली शैक्षणिक गुणवत्ता पुरेशी नाही, तर संवादकौशल्य, सर्जनशीलता आणि मूल्यशिक्षण हीदेखील व्यक्तिमत्त्व घडवताना तितकीच महत्त्वाची ठरतात.”
संजीवनी ग्रुपचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना सांगितलं की, “विद्यार्थी परिषद म्हणजे नेतृत्वगुणांचा पाया. शाळा ही उत्तम नागरिक घडवते, आणि ही संसद त्याचा उत्तम प्रारंभ आहे.”
या कार्यक्रमात राजविका कोल्हे हिने ‘हेड गर्ल’ आणि पार्थ भाऊराव याने ‘हेड बॉय’ म्हणून निवड जिंकली. विद्यार्थ्यांच्या विविध हाउस प्रतिनिधींमध्ये सिद्धी तांबे, श्रीजय बोरावके, मेरिष्का सबलोक, अक्षदा पानगव्हाणे, अर्जुन वडांगळे, भक्ती पानगव्हाणे, आणि अन्य विद्यार्थी झळकले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे, पालक आणि शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाण आणि संवादकौशल्य विकसित करण्याच्या संजीवनी शाळेच्या प्रयत्नांना यावेळी खऱ्या अर्थाने दाद मिळाली.