पुणे :
मंगळवार पेठेतील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट १च्या पथकाने अटक केली. याप्रकरणी निखिल दत्ता थोरात, रवी ज्ञानेश्वर बोत्रे , किरण ज्ञानेश्वर बोत्रे , अविनाश राजेंद्र कांबळे आणि राहुल म्हसू शिंदे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून २ कोयते, ५ मोबाईल, २ दुचाकी असा माल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींविरुद्ध चतु:श्रृंगी १, चंदननगर २, भारती विद्यापीठ २, कोथरुड ४, उत्तमनगर, हिंजवडी, परांडा येथे प्रत्येकी १ घरफोडी, जबरी चोरी, चोरी, दुखापत असे गुन्हे दाखल आहे. निखिल थोरात व किरण बोत्रे हे हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात २०१९ पासून फरारी असल्याचे तपासात निष्पन्न आहे.
