“सफाई कामगारांचं ऐका… नाहीतर ठेकेदार बदलाचं!” – आमदार अमोल खताळ यांचा थेट इशारा!

"सफाई कामगारांच्या मागण्या आठ दिवसांत मान्य करा… नाहीतर सध्याचा ठेकेदार बदलाच!" – असा ठाम इशारा आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना दिला आहे.

🧹
“सफाई कामगारांचं ऐका… नाहीतर ठेकेदार बदलाचं!” – आमदार अमोल खताळ यांचा थेट इशारा!

📍 संगमनेर | मेट्रो न्यूज स्पेशल रिपोर्ट

“सफाई कामगारांच्या मागण्या आठ दिवसांत मान्य करा… नाहीतर सध्याचा ठेकेदार बदलाच!”
– असा ठाम इशारा आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना दिला आहे.

🗣️ “कामगारांचा आवाज दाबू नका – त्यांच्या पाठीशी मी ठाम उभा!”
शहरातील सफाई कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले होते. याची माहिती मिळताच आमदार खताळ यांनी तात्काळ कारवाई करत शिवसेना शहरप्रमुख दिनेश फटांगरे आणि उपशहरप्रमुख अजित जाधव यांना नगरपरिषदेत पाठवले.

🛑 “कामगारांच्या मागण्या मान्य करा, नाहीतर ठेका रद्द करा!”
आ. खताळ यांच्या पुढाकाराने कामगारांना चर्चा करण्यासाठी जनसंपर्क कार्यालयात बोलावण्यात आले.
त्यानंतर कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले. बैठकीत मागण्यांचे निवेदन देताना स्पष्ट सांगण्यात आलं की:
👉 जुलै महिन्याचा पगार आज सायंकाळपर्यंत ऑनलाईन जमा केला जाईल
👉 दर महिन्याला चार पगारी सुट्ट्यांचे आश्वासन

⚠️ ठेकेदाराला ‘लास्ट वॉर्निंग’
“कामगारांचे शोषण खपवून घेतले जाणार नाही. आठ दिवसांत जर मागण्या मान्य नाही झाल्या, तर सध्याचा ठेका रद्द करून नवीन ठेकेदार नेमावा!” – आ. खताळ

👥 बैठकीत उपस्थित –
दिनेश फटांगरे, अजित जाधव, सफाई कामगार प्रतिनिधी आणि नगरपरिषदेचे अधिकारी


💬 “काम थांबवू नका, पण अन्याय सहनही करू नका. तुमच्या पाठीशी मी कायम आहे!” – आमदार खताळ