महाराष्ट्रात धक्कादायक अपडेट!
वळपास दीड कोटी रेशन कार्डधारकांना ऑगस्टपासून रेशनवरचं धान्य मिळणार नाही!

राज्यातील लाखो घरांवर मोठं संकट कोसळलंय.
जवळपास दीड कोटी रेशन कार्डधारकांना ऑगस्टपासून रेशनवरचं धान्य मिळणार नाही!
कारण साधं आहे – पुरवठा विभागाने थेट कारवाई केलीय.
सरकारने देशभरातील गरीब कुटुंबांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून मोफत धान्य देण्याची सोय केलेली आहे. यामुळे लाखो लोकांची गुजराण रेशनवर चालते. पण आता महाराष्ट्रातील जवळपास 1 कोटी 44 लाख 89 हजार शिधापत्रिका धारकांचे धान्य थांबवण्यात आलंय.
का थांबलं? 
कारण सरकारने केवायसी (KYC) मोहीम सुरू केली होती. ज्यामध्ये प्रत्येक शिधापत्रिका धारकांनी आपली ई-केवायसी करणे बाध्यतामूलक होते.
सरकारने सहा-सात वेळा मुदतवाढ दिली होती
… पण तरीही लाखो लोकांनी केवायसी केलीच नाही.
आता नियम पाळले नाहीत तर परिणाम भोगावे लागणारच! म्हणून पुरवठा विभागाने कारवाई करत थेट रेशनवरील धान्य बंद केलंय.
महत्वाचं म्हणजे –
- अनेक अपात्र लोक सुद्धा रेशनचा फायदा घेत होते.
![😡]()
- चांगलं उत्पन्न असूनही सरकारी धान्यावर डल्ला मारणाऱ्यांवर आळा बसावा म्हणूनच ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली होती.
- पण आता ई-केवायसी न केलेल्या सर्वांची रेशनवरील सुविधा थांबवली गेलीय.
यामुळे गरजूंपेक्षा अपात्रांना मिळणारा लाभ थांबेल, पण ज्यांनी फक्त दुर्लक्षामुळे ई-केवायसी केली नाही त्यांची मात्र अडचण झालीय.
आता राज्यातील दीड कोटी लोकांना ऑगस्टपासून रेशनवरील धान्य मिळणार नाही हे स्पष्ट झालंय. पुढे सरकार कोणता निर्णय घेते, पुन्हा मुदतवाढ मिळते का, की नियम अजून कडक होतात हे पाहणं खूपच रोचक ठरणार आहे.
तुमचं मत काय?
सरकारचा निर्णय योग्य आहे का
की गरीबांना यातून त्रास होईल
कमेंटमध्ये नक्की लिहा 

#Maharashtra #RationCard #BreakingNews #MetroNews #KYC #FoodSecurity #ViralNews
