महाराष्ट्रात मेगा पोलिस भरतीला हिरवा कंदील!
तब्बल 15,631 पदांची भरती – युवांसाठी सुवर्णसंधी
महाराष्ट्रात मेगा पोलिस भरतीला हिरवा कंदील!
तब्बल 15,631 पदांची भरती – युवांसाठी सुवर्णसंधी 
मुंबई :
पोलिस भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने तब्बल 15,631 पोलिस भरती पदांना मंजुरी देत अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
भरतीचा तपशील –
- पोलिस शिपाई – 12,399 पदं
- पोलिस शिपाई चालक – 234 पदं
- बॅण्डस्मन – 25 पदं
- सशस्त्र पोलिस शिपाई – 2,393 पदं
- कारागृह शिपाई – 580 पदं
म्हणजेच राज्यभरात मोठ्या प्रमाणात युवांना पोलिस दलात सामील होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
पार्श्वभूमी :
१२ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या भरतीला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आज गृह विभागाकडून अधिकृत जीआर प्रसिद्ध झाला. या निर्णयानुसार १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान रिक्त झालेली सर्व पदं १००% भरली जाणार आहेत. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून, यामुळे हजारो तरुणांना रोजगाराचा मार्ग मोकळा होणार आहे.
परीक्षा शुल्क :
- खुला प्रवर्ग – ₹450
- मागास प्रवर्ग – ₹350
ही फी ऑनलाईन जमा करता येईल आणि मिळालेली रक्कम थेट भरती प्रक्रियेत वापरली जाणार आहे.
पोलिस भरतीची जाहिरात लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, इच्छुक उमेदवारांनी अभ्यास व तयारीला आता सुरुवात करावी, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणाईसाठी ही एक मोठी संधी आहे. आता फक्त योग्य तयारी आणि कठोर परिश्रम करून या सुवर्णसंधीचं स्वप्न साकार करण्याची वेळ आली आहे.
