करीना कपूर खान वर गुन्हा दाखल करा .

" प्रेग्नेंसी बायबल" चा ख्रिस्ती बांधवांच्या वतीने निषेध

                            प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर हिने, गरोदर महिलांसाठी “करीना कपूर खान्स प्रेग्नेंसी बायबल” या नावाने पुस्तक काढले आहे. या पुस्तकात तिने गरोदर महिलांसाठी काही खास टिप्स आणि उपयुक्त गोष्टी सांगितल्या आहेत. परंतु या पुस्तकाच्या नावात, ख्रिस्ती बांधवांच्या पवित्र ग्रंथ “बायबल” चे नाव आहे. ही या धर्मग्रंथाची विटंबना आहे.

 

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा.

 

 

 

                         या कारणास्तव ख्रिस्ती समाज समन्वय समितीच्या वतीने ख्रिस्ती  बांधवांनी  वतीने निषेध करण्यात आलाय. ख्रिस्ती बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे  ख्रिस्ती समाज समन्वय समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलेय. या प्रकरणी करीना कपूर वर गुन्हा दाखल करा अशी मागणी ख्रिस्ती धर्माच्या धर्मगुरूंनी केली. या प्रसंगी समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.