नवीन वर्षात जो बायडन  येणार भारतीयांच्या भेटीला 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची बायडन यांच्या सूत्रे हाती

वॉशिंग्टन : 

२०२१ या आगामी वर्षाच्या जानेवारी महिन्यात अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे पदभार स्विकारल्यानंतर जो बायडन भारतीयांना भेट देणार आहेत. 
 
दस्तावेज नाहीत अशा पाच लाख भारतीयांसह एक कोटी १० लाख स्थलांतरितांना,आता अमेरिकेचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 
 
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांचे प्रशासन यासाठी आराखडा तयार करणार आहे. या निर्णयाचा फायदा भारतीयांसह एक कोटी १० लाख लोकांना होणार आहे.
 
बायडन यांच्या निवडणूक अभियानाद्वारे जारी करण्यात आलेल्या धोरण अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. बायडन लवकरच अमेरिकी काँग्रेसमध्ये अनिवासी सुधारणा कायदा मंजूर करण्यावर काम करणार आहे.
 
 या अंतर्गत कागदपत्रे नसलेल्या पाच लाखांहून अधिक भारतीयांसह एक कोटी १० लाख स्थलांतरितांना अमेरिकेचे नागरिकत्व देण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे,’ असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे