नगर शहरातील उच्चभ्रू व राजकीय नेत्यांची वसाहत असलेल्या यशवंत कॉलनीमध्ये गौरी यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सर्वत्र चर्चा सुरु आहे. माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.. यासंदर्भात साईदीप रुग्णालयाने तोफखाना पोलीस ठाण्यास माहिती कळवली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे. आज, शनिवारी रात्री उशीरा ही घटना घडली. गौरी प्रशांत गडाख (वय 35) यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे
गौरी प्रशांत गडाख यांनी गळफास घेतल्याची माहिती मिळत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गौरी प्रशांत गडाख मृतावस्थेत आढळल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे.
रात्री उशिरापर्यंत विच्छेदन प्रक्रिया सुरू होती. अत्यंत धक्कादायक अशी हि घटना असून जिल्ह्याच्या राजकारणात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान गौरी गडाख यांनी कशामुळे आत्महत्या केली याविषयी अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे. गौरी या प्रशांत यशवंतराव गडाख यांच्या पत्नी होत. तर राज्यचे जलसंधारण मंत्री शंकरराव यशवंत गडाख यांच्या भावजयी होत्या. गौरी यांचे माहेर लोणी ता राहता येथील आहे.
२५८ रुग्णांना डिस्चार्ज तर १९२ बाधितांची रुग्णसंख्येत भर
*दिनांक: ०७ नोव्हेंबर २०२०, सायंकाळी ६-३० वाजता*
*आतापर्यंत ५५ हजार ५४५ रुग्ण बरे होऊन परतले घरी*
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०६ टक्के*
*आज २५८ रुग्णांना डिस्चार्ज तर १९२ बाधितांची रुग्णसंख्येत भर*
अहमदनगर: जिल्ह्यात आज २५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५५ हजार ५४५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १३९३ इतकी झाली आहे.
*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*
*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*
*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*
*माझेकुटुंब_माझीजबाबदारी*