गुरूनानक देवजी सेवा ग्रुपच्या वतीने परीक्षेच्या पार्श्वभूमीवर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तक संचचे वाटप
कोरोनाचे संक्रमण कमी झाल्यानंतर नुकतेच शाळा सुरु झाल्या असून, लवकरच विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरूनानक देवजी सेवा ग्रुपच्या वतीने गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नऊवी व दहावी मधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तक संचचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनक आहुजा, महेश मध्यान, किशोर कंत्रोड, अवतार गुर्ली, संजय आहुजा उपस्थित होते.
जनक आहुजा म्हणाले की, कोरोनामुळे सर्वसामान्य वर्गातील आर्थिक परिस्थिती बिकट आहे. मुलांचे शैक्षणिक व दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा संकटकाळात सर्वांनी एकमेकांना आधार देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महेश मध्यान यांनी सर्व गरजू विद्यार्थ्यांसाठी नहेमीच सहकार्याची भूमिका राहणार असल्याचे विशद केले. विद्यालयाच्या ज्येष्ठ अध्यापिका अनिता भाटिया यांनी गुरूनानक देवजी सेवा ग्रुपच्या सामाजिक कार्याची माहिती दिली देऊन पाहुण्यांचा परिचय करून दिला. विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक रामदिन यांनी पाहुण्याचे स्वागत केले. उपमुख्याध्यापक पांडुरंग गोने आभार मानले. यावेळी पर्यवेक्षिका सरोजिनी रच्चा, प्रमोद चन्ना, संदिप छिंदम, ग्रंथपाल विष्णू रंगा, निलेश आनंदास, सुहास बोडखे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.