भारतीय लोकशाही पार्टीची स्थापना

ऐतिहासिक अहमदनगर शहरातून नव्या राजकीय पर्वाचा उदय होत असून, सर्वांना न्याय, हक्क मिळवून देण्याबरोबर समाजात समानता, एकता, बंधुता टिकविण्यासाठी भारतीय लोकशाही पार्टीची स्थापना झाली  आहे, असे  भारतीय लोकशाही पक्षाचे  राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब काळे संगितले.पक्षाची  पहिली बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली

यावेळी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पोपट बनकर, राष्ट्रीय सचिव सुभाष अल्हाट, राष्ट्रीय कार्याध्यक्ष विजय पाथरे, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य ईसाबाई शेख, पार्टीचे कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. महेश शिंदे, सागर आलचेट्टी, उत्तम पवार, बाबू काकडे, अनंत द्रवीड, अण्णासाहेब पाटोळे, विनोद साळवे, बाळासाहेब नेटके, ज्योती पाटोळे, आशा गायकवाड, शाहीर कान्हू सुंबे, विजय भालसिंग, किसन शिरोडकर, संजय घोडके, अनिल बर्डे, नवनाथ वाघ, प्रा. गोरख अंबरीत, अशोक कासार, राम कराळे, माणिक वाघ, गौरव पांढरकर, सिद्धांत पाटोळे, गणेश झिरपे आदी उपस्थित होते.

दिवसेंदिवस वाढत चाललेली अराजकता, गरीब कुटुंब आणखी गरीब तर श्रीमंत व्यक्ती आणखी श्रीमंत होताना दिसून येतो. ही विषमता दूर करण्यासाठी, शेतकर्‍यांसाठी ठोस उपाययोजना प्रत्यक्ष राबविण्यासाठी, माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी, भ्रष्टाचाराची पाळेमुळे उघडून फेकण्यासाठी, मुठभर लोकांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी, भांडवलदार वर्ग आर्थिकतेच्या जोरावर करीत असलेल्या राजकीय हस्तक्षेप तसेच घराणेशाहीचा नायनाट करण्यासाठी, सहकार क्षेत्रातील गुलामगिरी दडपशाही मोडीत काढण्यासाठी, पदवीधरांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी, जुनी पेन्शन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी, घरेलू कामगार, कंपनीतील कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी, खाजगी बँका, फायनान्स कंपन्यांची सावकारी मोडीत काढण्यासाठी आदी ज्वलंत प्रश्‍नांवर भारतीय लोकशाही पार्टी काम करणार असल्याचे काळे यांनी सांगितले. तर लवकरच अहमदनगर जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.