न्यायासाठी पेटला वाल्मिकी समाज!
हिस्सार गणेश हत्याकांड प्रकरणी दोषींवर कारवाईसाठी अहिल्यानगरात आंदोलन

हिस्सार गणेश हत्याकांड प्रकरणी दोषींवर कारवाईसाठी अहिल्यानगरात आंदोलन
अहिल्यानगर, ७ जुलै:
हिस्सार (हरियाणा) मध्ये १६ वर्षीय गणेश वाल्मिकी या अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी अद्यापही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने भारतीय वाल्मिक संघटनेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
गणेशच्या कुटुंबीयांचा वाढदिवसाचा आनंद काही क्षणातच दुःखात बदलला, जेव्हा दारू पिऊन आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण कुटुंबाला मारहाण केली. यात गणेशचा मृत्यू झाला, तर त्याचे वडील व भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. आई, बहीण आणि अन्य महिलांवरही अत्याचार झाला असल्याचा आरोप आहे.
अहिल्यानगरमध्ये झालेल्या निषेध आंदोलनात संघटनेने स्पष्ट शब्दांत सांगितले:
“१० दिवस झाले, पण कोणताही FIR, निलंबन किंवा अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई नाही! हे अन्याय सहन केला जाणार नाही.”
वाल्मिकी समाजाचा इशारा:
“जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मुलाचे अंत्यसंस्कार होणार नाहीत! आणि जर सरकारने दुर्लक्ष केले, तर संप पुकारू – साफसफाई बंद करू!”
संपाचा इशारा:
“आम्ही समाजासाठी अहोरात्र काम करतो, पण आता आमच्यावरच अन्याय झाला आहे. आता आम्ही शांत बसणार नाही!”
जिल्हा प्रशासनामार्फत राज्य सरकारकडे मागणी:
– दोषींवर तत्काळ अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करा
– पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करा
– कुटुंबाला न्याय द्या
या आंदोलनाने राज्यभरात खळबळ उडवली आहे.
आता प्रश्न फक्त एका मुलाचा नाही, तर संपूर्ण समाजाच्या अस्मितेचा आहे.