सरकारी कामात अडथळा – आरोपी निर्दोष

नगर- काटेवाडी, ता. पाचहीं, जि. अहमदनगर येथे जिल्हा परिषद शाळा येथे दि. ३०/०१/२०१५ रोजी सकाळी ११.०० वा. चे सुमारास आरोपी नवनाथ नामदेव उगलमुगले, रा. काटेवाडी शिवार याने त्याचे वडील नामदेव जानु उगलमुगले यांचा शाळा सोडल्याचा दाखला मागितला असता, सदरचा दाखला मिळण्याकरीता रु. १००/- चे स्टॅम्पवर अॅफिडेव्हीट देऊन एक दिवस दाखला देण्यास लागेल याचा आरोपीस राग येऊन त्याने फिर्यादी सुनिल भास्कर शिरसाठ (शिक्षक) यांना धक्काबुक्की करुन गचांडी धरुन शिवीगाळ व दमदाटी करुन टेबलावरील कागदपत्रांची फेका फेक करुन घाणघाण शिवीगाळ करुन शर्टाची गचांडी धरुन ” तु फार माजला आहेस, तुझा बेत पाहतो, त्यासाठी माझी इस्टेट घालविन परंतू तुला सोडणार नाही ” असे म्हणून फिर्यादीचे व इतर कर्मचा-यांचे सरकारी कामात अडथळा आणला, त्यावेळेस तेथे शाळेच्या मुख्याध्यापिका, इतर शिक्षक व शाळेतील विद्यार्थी जमा झाले असता, त्यांचे समोर शाळा चालू असतांना सदरचा प्रकार करुन सरकारी कामात अडथळा आणला त्यामुळे त्याचे ब्लडप्रेशर वाढले. पोलिसांनी आरोपी नवनाथ उगलमुगले यांचे विरुध्द भा.दं.वि. कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ अन्व्ये गुन्हा दाखल केला असता, त्याची चौकशी नुकतीच अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात होऊन आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
आरोपीतर्फे बचाव घेण्यात आला की, आरोपीने वडिलांचा दाखला मागितला असता, फिर्यादीनेच आरोपीस दमबाजी केली व त्याची तक्रार आरोपीने त्याच दिवशी सकाळी ११.३० वाजता शिक्षणाधिकारी यांचेकडे केली होती व त्याची माहिती फिर्यादीस झाल्याने त्याने उशीराने संध्याकाळी हि खोटी फिर्याद आरोपीस त्रास देण्यासाठी दिली असा बचाव घेतला होता. तो मा. न्यायालयाने ग्राहय धरुन आरोपीची निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड. सतिशचंद्र सुद्रीक यांनी काम पाहिले.