हर्षद मेहता या स्टॉक ब्रोकर वर बनलेली “स्कॅम १९९२- द हर्षद मेहता स्टोरी” हि वेबसिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच प्रदर्शि
त झाली आणि लोकांना आवडली. त्यांनतर आता हर्षद मेहता वर बिग बुल हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिषेक बच्चन दिसणार आहे. अभिषेक बच्चन ने “स्कॅम १९९२-द हर्षद मेहता स्टोरी” हि वेबसिरीज पाहून त्याचे सोशल मिडीयावर कौतुक केले आहे. अभिषेक ने सोशल मीडियावर लिहिले की , स्कॅम १९९२ पाहिला. हर्षद मेहता आणि टीम चे खूप अभिनंदन. खूप चांगला अभ्यास, चित्रण, निर्मिती आणि अभिनय . सर्व कलाकार अप्रतिम. असे वक्तव्य अभिषेक ने केले आहे.