खाकीदास बाबा ( माहेश्वरी ) मठ ट्रस्ट येथे भगवान गोवर्धन अन्नकोट महोत्सव संपन्न.

विद्युत रोषणाई व फुलांची आकर्षक  सजावट

अहमदनगर

 

दिवाळी पाड्व्या नंतर प्रथेप्रमाणे  खाकीदास बाबा ( माहेश्वरी ) मठ ट्रस्ट  येथे भगवान श्री.जगदीशजी मंदिर मध्ये “ भगवान गोवर्धन अन्नकोट महोत्सव” अत्यंत उत्साहात संपन्न झाला.५६ प्रकाराच्या अन्नपदार्थांची  मंदिराच्या गाभाऱ्यात अत्यंत आकर्षक पद्धतीने सजावट  करण्यात आली होती.पारंपारिक पद्धतीने या सर्व अन्न पदार्थांचा नैवेद्य दाखवून भक्तिभावाने आराधना करण्यात आली.संपूर्ण मंदिर परिसरात व मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची आकर्षक  सजावट  करण्यात आली होती.

 

 

 

यावेळी वैष्णवी भजनी मंडळा तर्फे अतिशय सुंदर भजन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.सौ. प्रमिला डागा  यांच्या हस्ते भजनी मंडळाचा सत्कार करण्यात आला.तसेच गौरव सोमनाथ धूत यांची आरबीआय जयपूर शाखेच्या मँनेजरपदी निवड झाल्या बद्दल  दीपक काबरा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आरती यजमान श्रीमती राधादेवी सारडा,श्रीमती पार्वतीदेवी दरक,श्रीमती सुचिता धूत,सौ.मंगला बिहाणी,सौ.तारादेवी लढ्ढा यांच्या हस्ते  भगवान जगदीशजी यांची आरती करण्यात आली.

 

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राइब करा. 

 

                         उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी खाकीदास बाबा मठ ट्रस्टचे चेअरमन दीपक काबरा,व्हा.चेअरमन शिवदास डागा,संचालक चंद्रकांत काबरा,मनोज मुंदडा ,बिहारीलाल भराडिया,प्रवीण बजाज,सुनील मुंदडा,जितेंद्र बिहाणी ,श्रीकांत काकांणी,श्रीकुमार सोनी,जगदीश दरक  व समाज बंधुभगिनी मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. किसन बंग यांनी केले .येत्या १८ नोव्हेंबरला त्रिपुरारी  पोर्णिमा दीपोत्सवासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मठातर्फे करण्यात आले.