मुंबई :
भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी आज शिवसेनेवर निशाणा साधला आहे. चार लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड २०२४ चा निवडणूक प्रचार आहे, असा आरोप शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून केला होता, त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी हे विधान केलं आहे.
“ब्रिगेडी हिंदुत्ववाद्यांनी रामवर्गणीला अग्रलेखातून लक्ष्य करावे हे स्वाभाविकच. ज्यांच्या पक्षाचा पिंड खंडणी आणि टक्केवारीवर पोसलाय त्यांना रामवर्गणीचे महत्त्व आणि ममत्व काय असणार?,” असं म्हणत भातखळकरांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
“ज्यांच्या ताटात अबूची बिर्याणी, इटालियन मातोश्रींचा पिझ्झा आणि धोरणी साहेबांची वांगी आहेत त्या नव ब्रिगेडी बाटग्याना राम वर्गणीच्या नावाने करपट ढेकर आले नसते तरच आश्चर्य होते,” असंही ते म्हणालेत.
देशातील रामभक्तांच्या सहकार्याने भव्य राम मंदीर उभे राहीलच, तुम्हाला त्याची चिंता नको! तुम्ही अजान स्पर्धाची काळजी करा, असं म्हणत भातखळकरांनी शिवसेनेला टोला लगावला.