कु.भावना येनगुल यांची जलसंपदा विभागात कॅनल इन्स्पेक्टरपदी
निवड झाल्याबद्दल पद्मशाली सोशल फाऊंडेशनच्या वतीने सत्कार
नगर : सावेडी मधील श्रमिकनगर येथील कु.भावना दिगंबर येनगुल यांची जलसंपदा महाराष्ट्र शासन नाशिक विभागात कॅनल इन्स्पेक्टरपदी निवड झाल्याबद्दल पद्मशाली सोशल फाऊंडेशनच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी पीएसआय अनिल अलवाल, शुभम सुंकी, श्रीनिवास बुरगुल, अक्षय यन्नम, भुषण येनगुल, जया येनगुल आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना अनिल अलवाल म्हणाले कि, यश हे प्रत्येकाचे ध्येय आहे. जीवन आव्हाने आणि संधींनी भरलेले आहे. पंरतु केवळ त्यांच्यासाठी जे प्रत्येक्षात संधी मिळवण्यासाठी आणि आव्हानांवर मात करण्यासाठी संघर्ष करतात त्यांना यश मिळत. आज कु.भावना हिने अथक परिश्रम घेऊन हे यश मिळविले आहे. त्यांचे वडील रिक्षा चालक आणि आई बिडी कामगार आहे. घरची परस्थिती नाजुक असून आपल्या मुलांना उच्च शिक्षण देवुन त्यांच्या ध्येया पर्यंत त्यांना पोहचविल आहे.यावेळी कु.भावनाचे वडील दिगंबर येनगुल म्हणाले मुलानी आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल आजचा झालेला आनंद हा वेगळाच वाटतो. सरकारी दलात काम करायचे हे कु.भावनाचे स्वप्न आज प्रत्यक्षात पूर्ण झाले. त्यासाठी तीने मनात जिद्द ठेवून अभ्यासात सातत्य, चिकाटी, परिश्रम घेऊन परीक्षा उत्तीर्ण झाली तीची झालेली निवड पद्मशाली समाजात भूषणावह आहे.