बाळासाहेब थोरातांची भाजपवर सडकून टीका 

सांगली :

भाजपला शेतकऱ्यांची जिरवायची आहे, म्हणूनच परदेशातून शेती माल आयात करण्यात येत आहे. पाकिस्तानातून देखील कांदा आयात करण्यात येत आहे. पाकिस्तान पेक्षा भाजपाला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो अशी घणाघाती टीका महसूलमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यश बाळासाहेब थोरात यांनी  आज भाजपवर केली आहे.

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब आणि हरियाणा राज्य तापून उठले आहे. तेथे आजही आंदोलन सुरू आहे.राज्यातील शेतकऱ्यांना चिमटा बसला नसला तरी धोका कायम आहे. आज शिल्लक साखरेचा प्रश्न गंभीर असताना निर्यात बंदी केली . याचा अर्थ शेतकऱ्यांची जिरवायची आहे.

कांदा आयात करायला सुरवात केली. पाकिस्तानातून कांदा आयात करण्याची चर्चा सुरू आहे.  म्हणजे आज देशातील भाजप सरकारला पाकिस्तानपेक्षा शेतकरी मोठा शत्रु वाटतो. दुधाची पावडर मोठ्या प्रमाणात शिल्लक असताना केंद्र सरकार परदेशातून पावडर आयात करण्याचा निर्णय घेते. दूध भाव न वाढण्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे. तशातच कृषी विरोधी कायदे आणले आहेत. त्यामुळेच कायद्याविरोधात काँग्रेसने एल्गार केला आहे.

*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*

*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*

*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*

*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*

*माझेकुटुंब_माझीजबाबदारी*

MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India’s largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला. सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in