“रक्तदान म्हणजे रुग्णसेवा” – आ. संग्राम जगताप
मोबाईल असोसिएशनच्या महा रक्तदान शिबिरात 5000+ रक्तदात्यांचा सहभाग!

मोबाईल असोसिएशनच्या महा रक्तदान शिबिरात 5000+ रक्तदात्यांचा सहभाग!
अहिल्यानगर | नंदनवन लॉन्स, टिळक रोड
मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित महा रक्तदान शिबिरात रक्तदात्यांचा महापूर उसळला. या वेळी प्रमुख पाहुणे आमदार संग्राम जगताप यांनी समाजासाठी ही एक सशक्त लोकचळवळ असल्याचं सांगितलं.
“रक्त हे आजच्या काळातील सर्वात अमूल्य देणं आहे. कोणतंही मशीन रक्त तयार करू शकत नाही, हे फक्त माणूसच देऊ शकतो!” – आ. जगताप
गेल्या ४ वर्षांपासून मोबाईल असोसिएशनकडून राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाने जिल्हाभरात 5000+ रक्तदात्यांचा सहभाग मिळवून समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे.
उद्दिष्ट:
– नव्या रक्तदात्यांना जोडणे
– तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकी वाढवणे
– अहिल्यानगरला “रक्तदान शहर” म्हणून ओळख मिळवून देणे
शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या हस्ते झाले.
उपस्थित मान्यवर:
आ. संग्राम जगताप, SP सोमनाथ घार्गे, CEO आनंद भंडारी, आयुक्त यशवंत डांगे, महंत संगमनाथ, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, अजित पवार, सचिन जगताप, विकी जगताप आणि अनेक मान्यवर.
मोबाईल असोसिएशन फक्त व्यवसायापुरती मर्यादित नाही – ती समाजसेवेचा आदर्श बनली आहे.
रक्तदानासोबतच युवकांना रोजगारही उपलब्ध करून दिला जात आहे.
तरुणांनो, आता वेळ आहे – वर्षातून २ वेळा रक्तदान करा आणि “हीरो” बना!