सुरेश मुनोत स्मृतीप्रीत्यर्थ उद्या रक्तदान शिबिर!
अहिल्यानगर : मर्चेंटस् बँकेचे माजी चेअरमन स्व. सुरेश मोतीलाल मुनोत यांच्या १४ व्या स्मृतीनिमित्त जय आनंद महावीर युवक मंडळ व सुरेश मुनोत फाऊंडेशनतर्फे रविवारी, १ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नवीपेठ येथील बाई ईचरजबाई फिरोदिया प्रशालेत सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत हे शिबिर होणार आहे, अशी माहिती मंडळाचे सेक्रेटरी आनंद मुथा व सुरेश मुनोत फाउंडेशनतर्फे मुनोत परिवाराने दिली. गेल्या १२ वर्षांपासून सुरेश मुनोत यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर घेण्यात येते. या शिबिरात पुरुषांइतकाच महिलांचाही सहभाग असतो. सर्वच क्षेत्रात पुरुषांच्याबरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलाही रक्तदान चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवतात. शहरातील रक्तपेढींच्या टीम रक्त संकलनाचे काम पाहणार आहेत. या शिबिरात जास्तीत जास्त रक्त दात्यांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.