आमचं ठरलंय : भैय्या गंधेच हवेत आम्हाला विरोधी पक्षनेता
भाजप कार्यकर्त्यांची पक्ष श्रेष्ठीकडे एक मुखी मागणी
अहमदनगर (संस्कृती रासने )
अहमदनगर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनाच देण्यात यावं अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे. भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत तसा ठराव करून तो चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले जाते आहे. भाजपचे पदाधिकारी ,नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी अशी एकमुखी मागणी पक्ष श्रेष्ठीकडे केली असल्याची माहिती भाजपचे जेष्ठ नेते वसंत लोढा यांनी दिली आहे. गंधे हे पालिकेच्या राजकारणातील सर्व पक्षीय व सर्व मान्य नेतृत्व असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.