ड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी छावा क्रांतिवीर सेनेचा उपोषणाचा ईशारा

दिनांक १ मे महाराष्ट्र दिनी करणार उपोषण : दखल न घेतल्यास दि. ३ रोजी आत्मदहन करणार

अहमदनगर (प्रतिनिधी)

                  बालिकाश्रम रोडवरील वाघमळा, विठ्ठलवाडी येथील दोघा रहिवाशांनी ड्रेनेज लाईन ची तोडफोड करून महापालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले  आहे . तसेच परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याशी खेळण्याचे कृत्य केले आहे. यासंदर्भात पालिका आणि जिल्हा प्रशासन तसेच पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणा याची कोणतीच दखल घेत नसल्याने हा प्रश्न छावा क्रांतिवीर सेनेने तडीस लावण्याचे ठरविले आहे. याप्रकरणी पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकावर कारवाई व्हावी या मागणीसाठी दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिनी आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

 

 

 

 

 

                            या संदर्भात पालिका आयुक्त व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना छावा संघटनेने स्मरण पत्र देखील दिले आहे. छावा क्रांतिवीर सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज कर्डीले यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक रहिवासी लक्ष्मण ढगे हे कुटुंबीय व इतर रहिवाशासोबत आमरण उपोषणास बसणार आहेत.  तसेच या उपोषणाची रीतसर दखल घेऊन पालिकेने कारवाई न केल्यास दिनांक ३ मे रोजी  अक्षय तृतीयेच्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा ढगे यांनी दिला आहे.

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा. 

 

 

                             या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, स्थानिक रहिवासी रजनीश वाघ आणि दीपक कावळे या दोघांनी परिसरातील जागा बळकावण्याच्या उद्देशाने  वाघमळा  येथील ड्रेनेज लाईनची तोडफोड केली आहे. ही लाईन सार्वजनिक जागेतून जात असताना त्यांनी त्यात दगड घालून ती बुजवली तसेच टिकाव घालून फोडली. त्यामुळे परिसरातील रहिवाशांची ड्रेनेज लाईन बंद होऊन  विठ्ठल वाडी वाघमळा, सिद्धार्थनगर  येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

 

 

 

 

                       दिनांक १३ मार्च २०२२ रोजी या दोघांनी हे कृत्य केले होते.  ही तोडफोड हे दोघे करीत असताना व्हिडीओ चित्रीकरण देखील झाले होते. फोटो देखील काढण्यात आले होते त्याचे रीतसर पुरावे देऊनही पालिका फक्त पंचनामा , परिसर पाहणीचा खेळ खेळत आहे. आणि राजकीय दबावापोटी कारवाईस टाळाटाळ करीत आहे . या समस्येची दखल प्रशासनाने घ्यावी यासाठी ढगे यांनी उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा दिला आहे.