बांगलादेशमध्ये पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप करावा

बांगलादेशमधील नेते चिन्मय कृष्ण दास यांची तुरुंगातून सुटका करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी उज्जैन येथील भाजपचे खासदार अनिल फिरोजिया यांनी बुधवारी लोकसभेत केली. देशद्रोहाच्या आरोपाखाली चिन्मय यांना तुरुंगात धाडण्यात आले आहे. लोकसभेत शून्य प्रहरात फिरोजिया यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, चिन्मय यांच्या वतीने युक्तिवाद करण्यासाठी गेले. बांगलादेशमध्ये एकही वकील उपलब्ध झाला नाही. मथुरा येथील भाजपच्या खासदार व अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सांगितले की, धर्माचा अपमान, हिंसाचार, अन्याय या गोष्टी कधीही कोणीही खपवून घेता कामा नये. चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेच्या मुद्द्याबाबत आम्ही गप्प बसणार नाही. बांगलादेशमध्ये दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असून त्या देशात प्रवास करताना सतर्क राहावे अशी सूचना ब्रिटन सरकारच्या फॉरिन, कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिसने (एफसीडीओ) केली आहे. आवश्यकता असेल तरच त्या देशात जावे असेही एफसीडीओने म्हटले आहे.