निंबळक बायपास रस्त्यावर परप्रांतीयांचे कचऱ्याचे दुकाने बंद करा 

संपूर्ण रस्त्याच्या परिसरावर एमआयडीसी कंपनीतले विषारी कचऱ्याचे साम्राज्य.

अहमदनगर
          निंबळक बायपास रस्त्यावर दुकानाच्या समोर व पाठीमागे मोकळ्या जागेत एमायडिसी मधील वेस्टेज विषारी कचरा हा साचवून ठेवून मोठ्या प्रमाणात ढीग करण्यात आल्या आहे त्यामुळे येथून जाणारया व येणार्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथील गुरव शाखेचे नायब तहसीलदार राजेंद्र दिवाण यांना निवेदन देताना सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे समवेत दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष योगेश जाधव, तालुकाध्यक्ष अमोल शिंदे आदी उपस्थित होते.

 

हे ही अवश्य पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा :

 

               एमआयडीसी कंपन्यांमधील विषारी व वेस्टेज कचरा निंबळक बायपास जवळील मोकळ्या जागेमध्ये परप्रांतीयांनी पत्र्याचे शेड चे दुकाने टाकली आहे एमायडिसी मधील विविध कंपन्यांमधील कचरा परप्रांतीय गोळा करून निंबळक बायपास रोडच्या कडेला मोकळ्या जागेमध्ये आणून टाकतात व ते कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावत नाही त्यामुळे निंबळक गावातील व निंबळक बायपास जवळील  नागरिकांना व तिथल्या पशु प्राण्यांना ह्या कचऱ्यापासून धोका निर्माण बनला आहे व नागरिकांना येथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने हे कचरा  भंगाराच्या  दुकाणे बंद करण्याची मागणी करण्यात आली.

 

 

        निंबळक बायपास  येथील कचरा, प्लास्टिक, कागद आधीच संपूर्ण रस्त्यावर पसरलेले दिसतात त्यामुळे रस्त्यावर संपूर्ण घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे व पावसाळ्यामध्ये या कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणात जाळण्यात येते तर या विषारी कचऱ्यामुळे पावसाळ्यात कचऱ्याची राख तळ्यामध्ये जाते त्या ठिकाणी निंबळक गावांमध्ये पशुपालन फार मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे प्राण्यांना देखील मोठा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे तथा जिल्हाधिकारी यांनी येऊन सदर ठिकाणी पाहणी करावी त्यानंतर योग्य ती कारवाई करण्याची मागणी ढवळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे हे कचऱ्याचे दुकान बंद न झाल्यास 13 ऑगस्टला अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.