निरर्थक लॉकडाऊन करण्यापेक्षा लसीकरणावर भर द्या..
आस्थापनांची वेळ बदलावी व विकेंड लॉकडाऊन स्थगित करावा
अहमदनगर
अहमदनगरच्या महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशनच्या वतीने, प्रशासनाला वीकएंड लॉकडाऊन स्थगित करावे , तसेच प्रशासनाने आस्थापनांची वेळ जी सकाळी ७ ते ४ अशी ठेवली आहे, ती बदलून सकाळी ९ ते ६ किंवा १० ते ७ अशी ठेवावी अशी मागणी केलीय. सध्याची दुकानांची वेळ ही ग्राहकांना आणि दुकानदारांना ही गैरसोयीची आहे, कारण कापड बाजारातील जवळपास सर्वच दुकाने ही सकाळी ९ वाजेदरम्यान उघडतात. त्या नंतर ग्राहकांची दुकानात गर्दी होते.
हे ही अवश्य पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा :
तसेच सायंकाळी ४ वाजेपर्यंत च दुकाने चालू असल्याने बाहेरगावच्या ग्राहकांची धावपळ होते. परिणामी दुकानदारांचे ही नुकसान होते. प्रशासनाने शनिवार आणि रविवारी संपूर्ण जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर केलाय. परंतु या वीकएंड लॉकडाऊन चा फायदा होताना दिसत नाहीय. विकेंड असल्यामुळे, नागरिक पर्यटन स्थळी जाणे पसंत करतात. त्यामुळे पर्यटनस्थळी गर्दी होते.
या विकेंड लॉकडाऊन चा काहीच उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे हा विकेंड लॉकडाऊन सरकारने रद्दच करावा, तसेच लॉकडाऊन मध्ये निरर्थक वेळ घालवण्यापेक्षा प्रशासनाने लसीकरण प्रक्रियेवर जास्तीत जास्त जोर देणे आवश्यक आहे, असे व्यापारी असोसिएशन चे सेक्रेटरी किरण व्होरा यांनी म्हणले आहे. तसेच आमच्या सर्व मागण्यांचा विचार करून यावर लवकरात लवकर उपाययोजना व्हावी अशी मागणी व्होरा यांनी केलीय.