
दहशत, खोटे गुन्हे आणि महिलांचा थेट आरोप!
अहिल्यानगर | पोलिस न्यूज नेटवर्क
“दोषी नाही, तरी गुन्हेगार ठरवलं जातंय!
हे थांबायलाच हवं!” – असा ठाम सुर महिलांनी लावला आहे.
नालेगावच्या म्युन्सिपल कॉलनीत एकतर्फी गुन्हे दाखल होत असल्याचा थेट आरोप करत महिलांनी शनिवारी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांची भेट घेतली. गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून दहशत माजवली जात आहे, आणि खोटे गुन्हे लावले जात आहेत, असा संतप्त सूर महिलांनी व्यक्त केला!
महिला शिष्टमंडळात सहभागी:
सोनाली रोखले, अॅड. अनिता दिघे, अनिता पवार, दिव्या भवार, शारदा भुजबळ, दुर्गा दळवी, रेखा पडोळे, रेणुका वाणे, व इतर अनेक स्थानिक नागरिक.
नेमकं प्रकरण काय?
रोहन चव्हाण, जितेंद्र चव्हाण आणि अविनाश हंस –
या तिघांवर महिलांनी थेट आरोप केला की, ते गुंड प्रवृत्तीचे असून, अवैध धंदे करून परिसरात दहशत निर्माण करत आहेत.
याच प्रकरणात पवन पवार व त्यांच्या मित्रमंडळींवर खोटे गुन्हे लावण्यात आले, असेही स्पष्ट करण्यात आले.
“ते घटनास्थळी होतेच नाहीत!” – असा ठोस दावा महिलांनी केला.
22 जुलै:
पवन पवार यांच्या घरातील देवीच्या जत्रेच्या कार्यक्रमादरम्यान, चव्हाण व हंस यांनी पूर्वनियोजित कट रचून प्राणघातक हल्ला केला, असा आरोप आहे.
23 जुलै:
पवार यांच्या तक्रारीनंतर, त्यांच्याच कुटुंबियांवर व मित्रांवर प्रतिशोधाच्या भावनेने खोटे गुन्हे दाखल, असा आरोप महिलांनी निवेदनात केला.
CCTV पुरावे काय सांगतात?
- केवळ गाड्यांची तोडफोड – लाकडी काठ्यांनी
- कोणत्याही धारदार हत्याराचा वापर नाही!
- मारहाण करणाऱ्यांकडे मात्र धारदार शस्त्रे होती, जखमी हॉस्पिटलमध्ये!
महिलांचा थेट आरोप:
“दहशत पसरवून, महिलांना पुढे करून, आणि खोटे गुन्हे लावून हे गुंड लोक परिसरात गोंधळ माजवत आहेत. आम्हाला आमच्या मुलांचं भविष्य वाचवायचंय!”
मागणी काय?
- खोटे गुन्हे मागे घ्या!
- दहशत पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा!
- गुन्हेगारांपासून सर्वसामान्य नागरिकांना संरक्षण द्या!
न्यायासाठी रस्त्यावर आलेल्या या महिला आता थांबणार नाहीत!
नालेगावला न्याय मिळावा, म्हणून त्यांच्या लढ्याला आवाज द्या!
नेमकं प्रकरण काय?