कंटेंट क्रिएटर्ससाठी खास एडिटिंग टूल्स!
इन्स्टाग्रामवर व्हिडीओ क्रिएटर्सना अनेक चांगले पर्याय दिले असले तरी इडिटिंगसाठी आतापर्यंत इतर ॲपची मदत घ्यावी लागत असे. पण आता इन्स्टाग्रामने ‘एडिट्स’ नावाचे एक नवीन व्हिडीओ एडिटिंग टुल उपलब्ध करून दिले आहे. यामुळे क्रिएटर्सना त्यांच्या कंटेटची निर्मिती आणि एडिटिंग करणे अधिक सोपे होणार आहे. क्रिएटर्सच्या गरजांचा विचार करून हे टूल डिझाइन करण्यात आले आहे. आता त्यांना हे व्हिडीओ अधिक गुणवत्तेमध्ये शेअर करता येतील. यासाठी विशेष टॅब दिले आहेत, उच्च-गुणवत्तेची कॅमेरा सेटिंग्ज, एडिटिंगची विविध टूल्स आणि रिअल-टाइममध्ये व्हिडिओंच्या कामगिरीचे निरीक्षण करणे शक्य होणार आहे. हे ॲप १३ मार्च २०२५ पासून डाउनलोड करता येईल.