डेलीहेल्थ हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर
तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी आणि उपचार
अहमदनगर (प्रतिनिधी ): नगरमधील ३डी कॉर्नर, तपोवन रोडवरील डेलीहेल्थ हॉस्पिटल मध्ये चार दिवसीय भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केलं आहे. (डेलीहेल्थ हॉस्पिटल ) शुक्रवार ५ फेब्रुवारी ते सोमवार ८फेब्रुवारी २०२१ या कालावधीत रोज सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत या शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध आजारांची तपासणी केली जाणार आहे. शुक्रवारी ५ फेब्रुवारीला सकाळी १० ते २ या वेळेत मोफत अस्थिरोग, संधिवात, हाडांचे विकार, मणकेविकार, हाडाचे फ्रॅक्चर तपासणी आणि उपचार डॉ. विशाल खराडे, आणि डॉ. शशिकांत गीते यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. ६ फेब्रुवारी रोजी मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा, फुफ्फुसाचे आजार, थायरॉईड, किडनी विकार यांची तपासणी आणि मेंदूविकार, अर्धांगवायू आणि संधिवात उपचार होणार आहेत. अशी माहिती हॉस्पिटल चे संचालक, डॉ. संदीप भुकन यांनी दिली.
रविवारी ७ फेब्रुवारीला बालरोग निदान आणि उपचार तसेच लसीकरण केंद्र, आणि नवजात बालकाच्या आहार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन डॉ. किशोर कवडे आणि डॉ. घनशाम वाळके करणार आहेत. डेलीहेल्थ हॉस्पिटल शिबिराच्या शेवटच्या दिवशी ८ फेब्रुवारी रोजी मोफत प्रसुतीपूर्व तपासणी आणि उपचार तसेच वंध्यत्व निवारण आणि चिकित्सा, मासिक पाळीच्या समस्या आणि स्त्रीरोग तपासणी डॉ. स्नेहल इंगळे, आणि डॉ. दिपाली गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. २४तास सेवा, ६१ बेड नी सुसज्ज विभाग, २० बेड्स चा अतिदक्षता विभाग, सुसज्ज ऑपरेशन थेटर, स्वतंत्र कोविड आणि नॉन कोविड विभाग, सुसज्ज प्रसूतिगृह, तज्ञ डॉक्टर्स, ओ.पी.डी सुविधा, महिलांसाठी स्वतंत्र जनरल वॉर्ड, स्पेशल आणि सेमी स्पेशल रूम, फिजिओथेरपी, एक्स रे, ईसीजी सुविधा, होमिओपॅथिक उपचार ही ह्या हॉस्पिटलची वैशिष्ट्ये आहेत. डेलीहेल्थ हॉस्पिटलमधील या आरोग्यतपासणी शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
MetroNews is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.
This is India’s Mega media group.
आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.
देश-विदेशातील घडामोडी,
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in
► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…
► Get Live updates on https://metronews.co.in/
► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/
► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha
►https://www.youtube.com/metronews
All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.