पारनेर :
१ हजार १०० बेडचे शरदचंद्र आरोग्य मंदीर सुरू करून देशभरात प्रकाशझोतात आलेल्या आमदार निलेश लंके यांनी प्लाझ्मा संकलनातही आघाडी घेतली आहे. शनिवारी कोव्हीड सेंटरमध्ये प्लाझ्मा संकलन कॅम्पचे आयोजन करण्यात येऊन त्यात ५० जणांनी प्लाझ्मा दान केले.
शनिवारी सकाळी आ. लंके यांच्या हस्ते डोनेशन कॅम्पचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले, कोरोनावर मात केलेल्या रूग्णांनी विशिष्ठ वेळेनंतर प्लाझ्मा दान करून कोरोना बाधितांना जिवदान देण्याचे पुण्य केले पाहिजे. कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेऊन बाहेर पडणाऱ्या रूग्णांनीही प्लाझ्मा दानात योगदान दिले पाहिजे. कोव्हीड सेंटरमध्ये सध्या प्रशासनाचे डॉक्टर उपचार करीत आहेत. आता डॉक्टरांच्या सल्ल्याने आयुर्वेद शास्त्राचा वापर करून रूग्णांवर औषधोपचार करण्यात येणार आहेत. या केंद्रामध्ये उपचार घेत असलेले रूग्ण सुरक्षित घरी गेले पाहिजेत या भुमिकेतून आम्ही काम करीत आहोत. या भयानक माहामरीत सेवाभावी वृत्तीने हे काम हाती घेण्यात आले आहे.
हे ही अवश्य पहा,आणि ताज्या बातम्यांसाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा
शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरात उपचार घेत असलेले रूग्ण माझे भाऊ आहेत, माझे आई, वडील आहेत. मी तुमचा कुटूंबप्रमुख आहे. येथे उपचार घेताना तुम्हाला कशाची गरज भासली तर मला हक्काने सांगा. तुमची सेवा मी करणार नाही तर कोण करणार ? असा सवाल करून आ. लंके म्हणाले, कोरोना रूग्णांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलला आहे. रूग्णांच्या घरातील लोकही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. अशा परिस्थीतीमध्ये तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे तुमच्या पाठीशी असे सांगत आ. लंके यांनी रूग्णांना दिलासा दिला.
आ. लंके पुढे म्हणाले, या केंद्रातून आतापर्यंत २ हजार २०० रूग्ण उपचार घेउन घरी परतले आहेत. १२८ रूग्णांना नगर येथे उपचारासाठी पाठवून त्यांच्यावरही यशस्वी उपचार झाले. हे कोव्हीड सेंटर नसून अखंड हरीनाम सप्ताह असल्याचे सांगत तुमच्या मनातील कोरोनाची भिती दुर झाली पाहिजे. प्रतिकारशक्ती कमी झाल्याने रूग्णांमध्ये भिती निर्माण होते. कोणीही मनामध्ये भिती बाळगू नका, काही होणार नाही मी तुमच्या पाठीशी उभा आहे अशी ग्वाही आ. लंके यांनी दिली.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटेे, अॅड. राहुल झावरे, उद्योजक सुरेश धुरपते, राजेंद्र चौधरी, बापूसाहेब शिर्के, अभयसिंह नांगरे, संदीप चौधरी, प्रमोेद गोडसे, संदीप रोहोकले, सुरज भुजबळ, बाळासाहेब खिलारी, दत्ता कोरडे, डॉ. बाळासाहेब कावरे, मुकूंदा शिंदे, अर्जुन कुलकर्णी, तहसिलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, डॉ. अनविता भांगे, डॉ. मानसी मानोरकर, डॉ. रजनी नवले, डॉ. प्रिया देशमुख, डॉ. अपूर्वा वाघमारे, डॉ. ॠतूजा गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.