चारित्र्यावर संशय घेऊन,

महिलेला घालायला लावला उकळत्या तेलात हात

सोलापूर  : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला उकळत्या तेलात हात घालण्यास सांगितल्याचा अघोरी प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यात  घडलाय . या प्रकरणात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय .  मात्र या प्रकरणाला एक नवे वळण लागले आहे. उकळत्या तेलात हात घालणाऱ्या महिलेन एका पोलीस कर्मचार्यासह दोन जन सतत बलत्कार करीत   असल्याचा आरोप केला केलाय . बलात्कार प्रकरणी भगवान धनवे आणि पोलीस कर्मचारी खुने या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. हे प्रकरण जरी उस्मानाबाद जिल्ह्यात घडले असले तरी सध्या हे दाम्पत्य सोलापूर जिल्ह्यात  असल्याने सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या प्रकरणात चौकशी करून तात्काळ झिरो नंबर ने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

उस्मानाबाद पोलिसांनी घटना घडून 4 दिवस झाले तरी गुन्हा दाखल केला नव्हता शेवटी  काल पहाटे 3:30 वाजता   सोलापूर पोलीस स्टेशनला झिरोने गुन्हा दाखल करून घेण्यात आला, व   त्या महिलेवर झालेल्या अन्यायाबाबत  तात्काळ  कारवाई  करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, यासाठी  भटके-विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक अॅड.डॉ अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली  आंदोलन करण्यात आले .चारित्र्यावर संशय घेऊन  उस्मानाबादचे जिल्हाधिकारी शिवकुमार वाणी व उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.  यावेळी राज्यातील भटके विमुक्त  आणि आदिवासी पारधी समाजातील   अशोक तांबे ,  अनिल काळे ज्ञानेश्वर भोसले ,पंडित भोसले , सुनिता भोसले ,वंदना पवार  आदी  उपस्थित होते.

Also see this and subscribe

 

  तुझ्या पतीला अडचणीत आणेन, जेलमध्ये टाकेन अशा स्वरुपाच्या धमक्या देत पोलीस कर्मचारी खुने याने पद आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पोलीस कर्मचारी खुने याने महिलेला धमकावले आणि तिच्यावर बलात्कार केला. या गुन्ह्यात त्याला भगवान धनवे याने साथ दिली, अशा स्वरुपाचा आरोप महिलेने केला आहे. या घटनेनंतर पतीने चारित्र्यावर संशय घेऊन उकळत्या तेलात हात घालण्यास सांगितल्याचे महिलेने सांगितले.

आणि याचा व्हिडीओ तयार करून तो व्हायरल केला .  पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पया महिलेला उकळत्या तेलात हात घालून ५ रुपयांचं नाणं बाहेर काढण्यास सांगितलं जात जर यात हात भाजला नाही आणि तेलातून जाळ बाहेर आला तर या महिलेचं चारित्र्य शुद्ध आहे असा समज होतो. या पीडित महिलेने तेलात हात घातला आणि तो गंभीर पणे भाजला आहे. आधुनिक युगातही अशा प्रकारे अंध श्रद्धा ठेवणाऱ्या    पती विरोधात पत्नीला उकळत्या तेलात हात घालण्यास सांगून अघोरी प्रथेचा अवलंब केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय    पीडित महिला आणि तिचा पती ज्या समाजाचे आहेत त्या समाज्याच्या जात पंचायतीवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी  आता होत आहे.

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.