नवनागापुरच्या संरपंच पदी डॉ. बबनराव डोंगरे व उपसंरपच पदी संगीता सप्रे यांची बिनविरोध निवड

नवनागापुरच्या औद्योगिक विकासाला चालना देणार : सरपंच डॉ. बबन डोंगरे

नगर : नवनागापुरच्या संरपंच पदी डॉ. बबनराव डोंगरे औद्योगिक विकासाला चालना देऊन नगर एमआयडीसी मध्ये नविन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच नवनागापुरच्या विकासाला चालना मिळणार आहे. ग्रामपंचायत ही गावच्या विकासामधील मुख्य दुवा आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम होते. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना गावामध्ये राबविण्यात येत असतात. निवडणुका संपल्या की गावाने आपआपसातले मतभेद विसरुन गावच्या विकासाकडे एकजूटीने काम करावे. असे प्रतिपादन नवनिर्वाचित संरपच डॉ. बबनराव दशरत डोंगरे यांनी केले.
नवनागापुर ग्रामपंचायच्या संरपच पदी डॉ. बबनराव डोंगरे व उपसंरपंच पदी संगीता दत्तात्रय सप्रे यांची निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा कौशल्य विकास अधिकारी रविकुमार पंतग, व ग्रामविकास अधिकारी एस.व्ही. मिसाळ यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी सदस्य महेश काडेकर, गोरक्षनाथ गव्हाणे, मगल गोरे, कल्पना गिते, दिपक गिते, रंजना दांगट, सागर सप्रे, हेमा चव्हाण, सत्यभागा डोंगरे, अर्जुन सुनवणे, राहुल भोर, सुशिला जगताप, संगीता भापकर, स्वाती सप्रे आदी उपस्थित होते.

Also See this and subscribe 

 

उपसंरपंच संगीता सप्रे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना ५0 टक्के आरंक्षण मिळाले आहे. या माध्यमातून महिलांना काम करण्याची संधी मिळाली आहे. नवनागापुरमधील महिलांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्राधान्य क्रम दिला जाईल सर्वांना बरोबर घेऊन काम केल्यास गावाच्या विकासाला चालना मिळते. प्रत्येक ग्रामपंचायतच्या विकासामुळे राज्याच्या व देशाच्या प्रगतीत भर पडत असते. यासाठी सर्वांनी कीच्या बळावर गावाच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे. असे त्या म्हणाल्या

नवनागापुर ग्रामपंचायच्या संरपच पदी डॉ. बबनराव डोंगरे . यावेळी ग्रामस्थ दत्तापाटील सप्रे, नरेश शेळके, विजय शेवाळे, योगेश गंलाडे, राजू शेवाळे, हनुमंत कातोरे, सुभाष दांगट, संजय गिते, ज्ञानदेव सप्रे, अशोक शेळके, किशोर वाकळे, शंकर शेळके, नवनाथ गव्हाने, चंद्रभान डोंगरे, संजय चव्हाण, निलेश शेवाळे, सुभाष ठेपे, शिवराज सप्रे, बाबासाहेब दांगट, अर्जुन गोरे, रशिद पठाण, अक्षय पिसे, आदी उपस्थित होते.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews