देशाला जातीनिहाय जनणगननेची काय गरज हे घटनाबाह्या आहे. – जेष्ठ कुलगुरु, विचारवंत, डॉ.सर्जेराव निमसे
देशात जातीनिहाय जणगनना या मुद्यावरुन संपुर्ण देशात मोठा वादंग सुरु
अहमदनगर – देशात जातीनिहाय जणगनना या मुद्यावरुन संपुर्ण देशात मोठा वादंग सुरु आहे. अश्यातच परवा संससदेमध्ये विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि अनुराग ठाकुर यांनी जातीनिहाय जनगननेवर आग्रह धरताना राहुल गांधी यांनी त्यांना विरोध केला होता. तेंव्हा राहुल गांधाींना त्या भाजपा खासदाराने डीवचले आणि ज्यांच्या जातीचा पत्ता नाही ते जातीनिहाय जनगनेचा आग्रह कसा धरु शकतात असा मुद्दा उपस्थित केला होता. याप्रकाराला भाजपा खासदारांनी प्रचंड समर्थन दिले. पण समाजवादी नेते अखिलेश यादव यांनी या धर्मनिरपेक्ष संसदेत एखाद्या खासदाराला त्याची जात कशी विचारली जाते. असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर चेअर वर बसलेले जगदंबीका पाल यांनी वादग्रस्त वक्तव्य मागे घेतले जातील असे देखील म्हटले होते. मात्र त्यावर राहुल गांधी यांनी मला कोणतीही माफी नको. तुम्हाला जे काही बोलायचे ते बोला. संसदेत आणि संसदेबाहेर आपण विरोध करतच राहू असे राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर देत म्हटले होते. या मुद्यावरुन देशाला जातीनिहाय जनणगननेची काय गरज हे घटनाबाह्य आहे, जातीय जनगणनेमुळे जातीय मतभेद तयार होतात, हे लोकशाहीच्या विरोधी असून, राज्यघटनेच्या ही विरोधी आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जातीय जनगणना करू नये. पुढची जनगणना होईल, त्यात धर्म लिहायचा का? तर नाही. भारत हा श्रीमंत व्हायला पाहिजे, तो म्हातारा होण्याआधी श्रीमंत व्हायला हवा. भारत हा तरुणांचा देश आहे, २०३५ सालापर्यंत आपण म्हातारे होऊ, त्यामुळे भारताने तरुण राहिले पाहिजे. गेल्या दहा वर्षात देशात गरीब आणि श्रीमंत हे अंतर प्रचंड प्रमानात वाढत चाललं आहे, असे वक्तव्य जेष्ठ कुलगुरु, विचारवंत डॉ. सर्जेराव निमसे यांनी केले.