भविष्यकाळात विकसित शहर पहावयास मिळेल : आ. संग्राम जगताप

विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांच्या प्रयत्नांना यश

नगर : शहरीकरणाच्या विस्तारीकरणाला चालना देण्यासाठी नवनवीन योनजना मंजूर
करुन आणण्याचे काम सुरु आहे. मुलभूत प्रश्‍्नापासून कामे सोडविण्याचे काम केले आहेत.
सामाजिक प्रश्नापासून ते विकासाच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित केले आहे. भविष्यकाळात आपल्या
सर्वांना विकसित नगरशहर पहायला मिळणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकचा
निधी शहराला मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांनी प्रभाग क्र.
१ मध्ये विविध विकासकामे मंजूर करुन घेतले आहे. त्यामुळे प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला
चालना मिळणार आहे. टीम वर्कमुळेच विकासकामे मार्गी लागत असतात. याचबरोबर नियोजनाची
खरी गरज असते. तसेच विकास कामासाठी पाठपुरावा केल्यामुळेच ही कामे मंजूर होतात.
भिस्तबाग महल ते भिस्तबाग चौकापर्यंतच्या कॉलनीतील पाण्याचा प्रश्न जलवाहिनीमुळे मार्गी
लागणार आहे. त्यानंतर लगेच टी.व्ही. सेंटर, प्रोफेसर कॉलनी, कुष्ठधाम रोड, भिस्तबाक चौक,
पवननगर ते महालापर्यंतच्या रस्त्याच्या रुदीकरणासह नवीन रस्त्यांच्या कामाला प्रारंभ होणार
असल्याचे आ. संग्राम जगताप यांनी सांगितले.

Also see this and subscribe

विरोधी पक्षनेता तथा नगरसेवक संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून भिस्तबाग महाल ते
भिस्तबाग चौक दरम्यान जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न
झाला. भविष्यकाळात यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेविका दीपालीताई बारस्कर, सामाजिक
कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर, नगरसेवक अविनाश घुले, साहेबराव कसबे, रामदास ढवण,
किसन कसबे, सतीश ढवण, राहुल कसबे, गणेश कसबे, कारभारी शेंडे, विजय भोसले, संपत
बारस्कर, अँड. हरिश चंद्रे, जयंच खरमाळे, सिद्धार्थ काळे, संकेत शिंगटे, रावसाहेब चव्हाण, इंजि.
शेंडगे, संजय गाडे, विजय नालकर, विनय पवार, साळी, अण्णा जगताप, आमले, बेल्हेकर,
गोंदकर, नांगरे, झुरळे, लोंढे, देवकर, व्यवहारे, जेजूरकर आदी यावेळी उपस्थित होते.

भविष्यकाळात  यावेळी संपत बारस्कर म्हणाले की, जयभवानी नगर, दत्त नगर, तुळजानगर,
श्रीकष्णनगर, पुण्यश्लोक कॉलनी, कसबे वस्ती, साईराम नगर, नंदनवन नगर व महाल
परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता. पाठपुरावा करून हा प्रश्‍न मार्गी लावला.
यानंतर लगेच या रस्त्याच्या रुदीकरणासहीत डांबरीकरणाचे काम सुरु होणार आहे. त्यामुळे या
परिसराचा पिण्याच्या पाण्याचा व रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यानंतर पर्यावरणाच्या
दृष्टिकोनातून स्वखर्चातून व नागरिकांच्या लोकसहभागातून सुमारे १000 वृक्षांची लागवड व
संवर्धन करणार आहे. आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नामुळे या भागाच्या विकासाला चालना
मिळाली आहे, असे ते म्हणाले. यावेळी डॉ. सागर बोरुडे, नगरसेविका दिपाली बारस्कर, अविनाश
घुले आदींची भाषणे झाली.