महाडच्या पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत रवाना
सहानूभुतीतून नव्हे, तर कर्तव्य म्हणून प्रत्येकाने हातभार लावावा -आ. संग्राम जगताप
अहमदनगर
जय आनंद फाऊंडेशनच्या वतीने महाड येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही मदत रवाना करण्यात आली.
हे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा
यावेळी मर्चंट्स बँकेचे संचालक तथा जय आनंद फाऊंडेशनचे संस्थापक कमलेश भंडारी, जय आनंद फाउंडेशनचे रितेश पारख, सुमित लोढा, गौरव बोरा, अमित काबरा, वैभव मेहेर, पिंटू कटारिया, प्रितेश कांकरिया, निलेश भंडारी, अभिजित मुनोत, अमित वर्मा, अनुज सोनिमंडलेचा, संभाजी पवार, वैभव ढाकणे आदी उपस्थित होते.
कोरोनाचे संकट व कोकणमध्ये सुरु असलेल्या महापूरामुळे वाढदिवस साजरा न करता इतर खर्चांना फाटा देऊन जय आनंद फाउंडेशनचे कमलेश भंडारी यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचा उपक्रम राबविला. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, पूराच्या प्रलयाने कोकण भागातील नागरिकांचे कुटुंब उध्वस्त झाली आहे. पूरग्रस्त बांधवांना मदत देण्याची गरज आहे. ही मदत सहानूभुतीतून नव्हे, तर कर्तव्य म्हणून प्रत्येकाने हातभार लावण्याची गरज आहे.
संकटात अडकलेल्या आपल्या बांधवांना धीर देण्यासाठी ही मदत शहरातून जात आहे. जय आनंद फाउंडेशन कमलेश भंडारी यांनी आपला वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्तांना पाठवलेली मदत प्रेरणादायी आहे. तसेच संकट काळातIने नेहमीच सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला आहे.
कोरोनाचे संकटकाळ असो किंवा मागील काळात कोल्हापूरला आलेले महापूर असेल यामध्ये जय आनंद फाउंडेशनने योगदान दिले असून, सामाजिक भावनेने सर्व युवक कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कमलेश भंडारी यांनी पुराचे पाणी घरात शिरुन तेथील लोकांचे संसार उघड्यावर आले असून, त्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वांनी पूरग्रस्तांना मदत द्यावी. अशा संकटकाळात आपण सण, उत्सव व वाढदिवस साजरे करणे चुकीचे असून, आज ती वेळ नसून आपल्या बांधवांना मदतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.