भंडारदरा परिसरात धुडगूस घालणार्‍या मद्यपी पर्यटकांचा बंदोबस्त करावा -महेश शेळके

महिला व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

महाराष्ट्राची चेरापुंजी असलेल्या अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत आहे. मद्यपी पर्यटक धुडगूस घालत असल्याने स्थानिक महिला व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून, या भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश शेळके यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

 

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे भंडारदारा व वाकी या ठिकाणी पर्यटनासाठी विविध भागातील पर्यटक येत आहे. अतिउत्साही काही पर्यटक दारू पिऊन विनाकारण धिंगाणा घालत आहे. तर स्थानिक नागरिक व व्यवसायिकांना त्रास देत आहेत. सदर भागात असणार्‍या महिलांची छेडछाड होत आहे. पोलिसांवर हल्ले करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. रात्रीच्या वेळी दरोडे सारख्या घटना घडत असतात.

 

 

 

 

 

शनिवारी व रविवारी सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी आहे. येणारी वाहने सुद्धा शिस्तीत चालविण्यात येत नाहीत. सध्या कोरोनाचे प्रादुर्भाव असून देखील या भागात नियमांचे पालन करताना पर्यटक दिसत नाही. पर्यटक हे स्थानिक महिलांकडे बघून अश्‍लिल हावभाव करतात. त्यामुळे स्थानिक महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांचा उदरनिर्वाह पर्यटनावर अवलंबून असून, धुडगूस घालणार्‍या पर्यटकांमुळे  पर्यटन व्यवसायावर विपरित परिणाम होणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. धुडगूस घालणार्‍या पर्यटकांचा बंदोबस्त करण्यासाठी  राजुर पोलीस स्टेशन येथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी शेळके यांनी केली आहे.