पंजाबच्या रस्त्यावर कंगनाची खिल्ली 

 चंदीगड :

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे.  अशा परिस्थितीत आता पंजाबचे लोक कंगनाची खिल्ली उडवत आहेत.  त्यामुळे कंगनावर अनेक विनोदी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  अशीच एक पोस्ट आज सोशल मीडियावर पाहायला मिळाली आहे. 

 
या फोटोमध्ये एका डमी रुग्णाचं ऑपरेशन सुरु आहे, ज्यावर कंगनाचे काही फोटो लावण्यात आले आहेत.  हा फोटो आता सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. 
 
या फोटोसोबत ‘पंजाबमधील रस्त्याच्या कडेला कंगना रनौतची मेंदू शस्त्रक्रिया… सभ्यतेने डोक्याचे आजार बरे करण्यासाठी बाजारपेठेतलं नवीन तंत्रज्ञान ‘ असं कॅप्शन देण्यात आलं आहे.