भिंगार कॅम्पमध्ये जुगार अड्ड्यावर धाड – १७ लाखांचा मुद्देमाल जप्त!
अहिल्यानगर-संभाजीनगर रोडवरील हॉटेल इंद्रायणी शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून १२ जणांना ताब्यात घेतले.

जप्त मुद्देमालात:
₹92,990 रोख
16 मोबाईल (किंमत ₹2.4 लाख)
6 वाहने (किंमत ₹14 लाख)
पोलीसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच काही इसम पळून जात असताना पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये गजराजनगर, मुकुंदनगर, भिस्तबाग, हातमपुरा, शिरूर, केडगाव आदी भागातील नागरिकांचा समावेश आहे.
संबंधित आरोपींवर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष पथकात पोनि योगेश चाहेर, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ आणि त्यांची टीम – चौधरी, कारखेले, भिंगारदिवे, बनकर, पवार, मोरे, ढाकणे यांच्या कडून ही कौतुकास्पद कारवाई पार पडली.
पोलिसांचा हा अॅक्शन मोड पाहून स्थानिकांतून समाधान व्यक्त होत आहे. अशा अवैध धंद्यांवर पोलिसांनी अजून जोरदार कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.