6 महिन्यांत पेट्रोलच्या किंमती 66 वेळा वाढल्या

केंद्र सरकारचे  महागाई वाढवण्याचं धोरण

नवी दिल्ली 

पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. महागाई यावरून काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या 6 महिन्यांत देशात पेट्रोलच्या किंमती जवळपास 66 वेळा वाढल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तर शुद्ध देशी तुपापेक्षाही जास्त झाल्या आहेत, असा टोला पायलट यांनी लगावला आहे.

 

हे ही पहा आणि  चॅनेल सबस्क्राईब करा

 

 

 

पेट्रोलच्या किंमती सातत्याने वाढत असून अनेक ठिकाणी दराने शंभरी पार केली आहे. पेट्रोल दरवाढीचा महागाईवर परिणाम होत असल्याचं देखील पायलट यांनी सांगितलं आहे.

देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. यामुळे अनेक कुटुंबांना पुरेसं अन्न देखील मिळत नाही. फक्त पेट्रोलचाच विचार करायचा झाला, तर अनेक राज्यांमध्ये पेट्रलच्या किंमतींनी शंभरी गाठली आहे. गेल्या 6 महिन्यांत देशात पेट्रोलच्या किंमती जवळपास 66 वेळा वाढल्या आहेत. यावरूनच केंद्राचं महागाई कमी करण्यापेक्षा महागाई वाढवण्याचंच धोरण असल्याचं दिसून येत आहे, अशी टीका सचिन पायलट यांनी केली आहे.

 

 

 

 

 

 

दरम्यान, कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू-कश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, लद्दाख आणि सिक्किममध्ये महागाई  पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे.