जस्टिन ट्रुडोंना भारताचं प्रत्यूत्तर

नवी दिल्ली :

 

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो  यांनी भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत व्यक्त केलेल्या चिंतेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कडक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलीय.

 भारताच्या अंतर्गत मुद्यात हस्तक्षेप न करण्याचा सल्लाही देण्यात आलाय.  परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ट्रुडो यांच्या टिप्पणीवर मीडियानं केलेल्या प्रश्नांना उत्तर दिलं.
 
 ‘आम्ही भारतीय शेतकऱ्यांशी संबंधित कॅनडाच्या नेत्यांची टिप्पणी पाहिली, परंतु ही प्रतिक्रिया चुकीच्या माहितीवर आधारीत आहे. या पद्धतीच्या टिप्पण्या अनावश्यक आणि निरुपयोगी आहेत.  विशेषकरून जेव्हा ही बाब एका लोकशाही देशातील अंतर्गत मुद्द्यासंबंधीत असेल. अशा गोष्टी राजकीय हेतूनं चुकीच्या पद्धतीनं समोर आणू नये, हीच योग्य गोष्ट ठरेल’ असं प्रत्यूत्तर श्रीवास्तव यांनी दिलं आहे.