स्वातंत्र्यदिनानिमित्त घरगुती उद्योग करणार्‍या महिलासाठी सवलतीमध्ये, व्यावसायिक लायसन व पॅन कार्ड शिबिराचे आयोजन

नगर – माऊली इको सर्विसेस च्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त घरगुती छोटे-मोठे व्यवसाय/ उद्योग करणार्‍या महिला भगिनींसाठी सवलतीच्या दरात व्यावसायिक लायसन व पॅन कार्ड शिबिराचे आयोजन केले आहे, या शिबिरामध्ये शॉपक्ट लायसन, उद्यम रजिस्ट्रेशन , फूड लायसन तसेच पॅन कार्ड हे प्रत्येकी 100 रुपयात काढून देण्यात येईल, तसेच एकल महिलांसाठी वरील योजना संपूर्णपणे मोफत असेल, असे माऊली इको सर्व्हिसेसचे संचालक प्रा.अमोल खाडे यांनी सांगितले,
शिबिर दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत माऊली इको सर्व्हिसेस ,ज्ञानेश्‍वर मोटार ड्रायव्हिंग स्कूल समोर,भिस्तबाग चौक, कुष्ठधाम रोड,सावेडी, अहमदनगर येथे होईल, अधिक माहितीसाठी संपर्क_ 9130845550.