अर्थमंत्र्यांनी केलं एप्रिल फुल ; व्याजदर कपात ही नजरचूक – अर्थमंत्री;

बचतींवरील व्याज कपातींचा निर्णय नजरचुकीने घेतला गेला.

 

पीपीएफसह विविध बचत योजनांवरील व्याज कपातीचा निर्णय म्हणजे नजरचूक आहे अशी सारवासारव करण्याची वेळ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर आली.

24 तासांच्या आत हा निर्णय मागे घ्यावा लागला. दरम्यान, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची शक्यता असल्याने व्याज कपातीचा निर्णय बदलल्याचे समजते.

 

बचत ठेवींवरील व्याज कपातीचा निर्णय बुधवारी सायंकाळी अर्थमंत्रालयाने जाहीर केला. याची अंमलबजावणी आजपासून होणार होती.

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक, मध्यमवर्गीयांना मोठा फटका बसणार होता.

सरकारविरुद्ध सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. पश्चिम बंगालसह पाच राज्यांत विधानसभा निवडणूक सुरू आहे.

तेथे भाजपला फटका बसला असता म्हणून आज सकाळी निर्णय बदलला.

 

बचतींवरील व्याज कपातींचा निर्णय नजरचुकीने घेतला गेला.

हा निर्णय मागे घेण्यात येत असून, पूर्वीप्रमाणेच मार्च 2021 मध्ये पीपीएफ आणि इतर बचतींवरील जे व्याजदर होते ते जैसे थे राहतील, असे ट्विट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळीच केले.

केंद्रीय अर्थ मंत्रालयातील अधिकाऱयांचा दावा; व्याजदरात कपात नजरचुकीने हेच चुकीचे!

पीपीएफ, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अशा छोटय़ा बचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय पेंद्र सरकारने बुधवारी घेतला.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे ‘नजरचुकी’ने झाल्याचे ट्विट करत सारवासारव केली.

मात्र छोटय़ा बचत योजनांवरील व्याजदरात नजरचुकीने कपात होणे हेच मुळात चुकीचे आहे, असे होऊच शकत नाही असा दावा केंद्रीय अर्थ मंत्रालयातीलच अधिकाऱयांनी केला आहे.