महिलांना सुसाईड नोट ठेवून काम करावे लागणे हे दुर्दैव!!!!!

भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांची मंगळवारी पत्रकार परिषद

 

अहमदनगर (संस्कृती रासने )

 

भाजपच्या प्रवक्त्या आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा  चित्रा वाघ यांनी मंगळवारी नगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विषयी वाघ यांनी आपली भूमिका मांडली. महिलांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात सुरु आहे, असे त्या म्हणाल्या.

 

 

ह भ प महाराज  बिदागी घेऊन पुढच्या गावात कार्यक्रम करा , परंतु कुठल्याही महिलेच्या वेदनेची  अशा प्रकारे  थट्टा करू नका, असा टोला ही चित्रा वाघ यांनी इंदुरीकर यांना लगावला. कुत्री भुंकतात आणि हत्ती चालत राहतो, असे म्हणणे म्हणजे सत्तेतील बेलगाम घोडयांना हत्ती म्हणून बळ देण्याचे काम केले जातेय. असे चित्रा वाघ म्हणाल्यात.

 

 

 

नारायण राणेंच्या अटकेविरुद्ध ही त्यांनी प्रतिक्रिया मांडली.  कायदे आणि नियम फक्त भारतीय जनता पार्टी साठीच आहेत का??  ही तत्परता औरंगाबाद, पुणे आणि पारनेर मध्ये का नाही दाखवली ?? असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारलाय. तहसीलदार देवरेंनी भाजप च्या काही पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असला तरी ही भाजप पूर्णपणे ज्योती देवरेंच्या पाठीशी उभी आहे, असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.