जलतरण स्पर्धेत कराळे क्लब हाऊसने जिंकले १३ सुवर्ण
५ खेळाडूंनी १३ सुवर्ण , ४ रौप्य आणि ४कास्य पदकांची कमाई करीत नगरचे नाव मोठे केले
अहमदनगर (प्रतिनिधी) छत्रपती संभाजी नगर इथे नुकत्याच झालेल्या राज्य स्तरीय जलतरण स्पर्धेत नगरच्या कराळे हेल्थ क्लब च्या जलतरण तलावात जलतरणाचा सराव करणाऱ्या जलतरण पटू नी आपल्या क्रीडा कौशल्याने १३ सवर्ण पदके जिंकली आहेत.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या ५ खेळाडूंनी १३ सुवर्ण , ४ रौप्य आणि ४कास्य पदकांची कमाई करीत नगरचे नाव मोठे केले आहे.
नुकत्याच छत्रपतीं संभाजी नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जलतरण तलावात या राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या . स्व. एच एन बिरादर यांच्या स्मरणार्थ स्विम मराठवाडा ही स्टेट लेव्हल चॅम्पियनशीप आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कराळे क्लब हाऊस मधील जलतरण तलावात नियमीत सराव करणाऱ्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
त्यात नगरच्या खेळाडूंनी आपली चुणूक दाखवत २१ पदकांची कमाई केली. स्पर्धेची चॅम्पियनशिप देखील नगरच्या नावे झाली. २१ पदकामधे १३ सुवर्ण पदके आहेत ४ रौप्य पदके आहेत आणि ३ कांस्य पदक आहेत. फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक, बटर फ्लाय , आय एम अशा प्रकारात २५ मीटर, ५० मीटर, १०० मीटर आणि २०० मीटर अंतराच्या स्पर्था झाल्या त्यात.
नगरच्या तनुजा फुंदे हिने ५ सुवर्ण आणि १ रौप्य पदक जिंकले, अमित सिंग राजपूत याने ४ सुवर्ण आणि २ रौप्य पदकांची कमाई केली. अभिषेक रासने याने २ सुवर्ण १ रौप्य आणि १ कास्य पदके तर यश वर्मा याने प्रत्येकी १ सुवर्ण आणि कास्य पदक पदरात पाडले. आणि श्रेया फुंदे हिला ३ कास्य पदके मिळाली. यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन होत आहे.
कराळे क्लब हाऊस देत असलेल्या सुविधा आणि सर्वेश देशमुख यांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळेच हे यश आम्हाला संपादित करता आल्याची प्रतिक्रिया खेळाडूंनी दिली. आणि नगर मध्ये आल्यानंतर कराळे क्लब हाऊस मध्ये येऊन खेळाडूंसमवेत विजयाचा जल्ल्लोष केला.
कराळे क्लब हाऊस मध्ये जलतरण प्रशिक्षक सर्वेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे खेळाडू पोहण्याचा सराव करतात . त्यांना कराळे क्लब हाऊस चे संचालक उदय कराळे, करण कराळे यांनी प्रोत्साहन दिले व सर्वतोपरी सहकार्य केले