‘लोकसेवक आपल्या दारी’

तरडगाव ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम.

(ह्रिषीकेश राऊत)

कर्जत तालुक्यातील तरडगाव ग्राम पंचायतच्या सरपंच संगिता वैजिनाथ केसकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या अनोखा जनता दरबार उपक्रमामुळे तरडगावच्या इतिहासामध्ये मध्ये हा प्रथमच एवढा मोठा जनता दरबार भरवण्यात आला आहे या माध्यमातून ग्रामस्थांची अनेक कामे मार्गी लागणार असल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

 

 

 

तरडगावच्या महिला सरपंच संगीता केसकर व त्यांचे पती वैजिनाथ केसकर यांनी ग्रामपंचायत सदस्य, गावातील लोकसेवक व ग्रामस्थांच्या सहकार्याने मंगळवार दि. २8 जुलै रोजी तरडगावमध्ये अनोखा जनता दरबार आयोजित केला होता. या जनता दरबारात गावातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी, आरोग्य अधिकारी, पशु वैद्यकीय अधिकारी, बँक अधिकारी, वायरमन, शिक्षक, पोलीस पाटील, रेशन दुकानदार, रोजगार सेवक असे सर्व सेवक उपस्थित होते.

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

   जनता दरबाराच्या माध्यमातून गावातील गोर, गरीब, कष्टकरी, शेतकरी, विधवा, परित्यक्ता व गावातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेता येईल. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, पिकविमा योजना, फळबाग अनुदान योजना, राष्ट्रीय साहाय्य योजना, बालसंगोपन योजना, वीज कनेक्शन,  कृषी विषयक सल्ला, बँक कर्ज प्रकरण, महिला बचत गटासाठी विविध योजना, पशु वैद्यकीय उपचार, शासकीय घरकुल योजना, रुग्णालयातील मोफत आरोग्य उपचार, शाळाप्रवेश, रेशनवरील धान्य योजना, महिलांसाठी विविध प्रशिक्षण अशा अनेक बाबींची माहिती संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिली. तसेच ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार यांच्या मार्फत मिळणारे विविध कामांसाठी आवश्यक दाखले त्याबाबत देखील सविस्तर माहिती मिळाली.

 

 

 

 

 

सरपंच संगिता केसकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या जनता दरबारात कृषी सहाय्यक विश्वास तोरडमल, तलाठी राठोड भाऊसाहेब, वायरमन शिंदे साहेब, ग्रामसेवक विठ्ठल बरबडे यांनी नागरिकांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. वैजिनाथ केसकर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.हा जनता दरबार यशस्वी करण्यासाठी जयराम देवकाते, मोहन केसकर, भास्कर केसकर, रामदास देवमुंडे,आप्पा देवकाते, अंगद शेंडकर, अभिमान शेंडकर, सखाराम केसकर, आण्णा देवमुंडे, पिंटू देवमुंडे, भरत देवमुंडे शरद देवकाते, भागवत केसकर, दादा केसकर यांनी परिश्रम घेतले.