राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे झापवाडी हेलीपॅड येथे आगमन
अहमदनगर, दि.३० नोव्हेंबर (जिमाका): -* राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सकाळी भारतीय वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने झापवाडी (ता.नेवासा) हेलिपॅड येथे आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला यावेळी उपस्थित होते.