जगातील सर्वांत मोठ्या धार्मिक कार्यक्रमातून २ लाख कोटींची उलाढाल!

सोमवार १३ जानेवारीपासून सुरू झालेला महाकुंभ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सुमारे ४० कोटी भाविक सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कैट) राष्ट्रीय महासचिव आणि खासदार प्रवीण खंडेलवाल यांच्या मते या महाकुंभात २ लाख कोटींपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल होणार आहे. यामुळे देशाच्या अर्थकारणालाही गती मिळेल. देश-विदेशातून या महाकुंभाच्या निमित्ताने पवित्र स्नानासाठी भाविक येणार आहेत. प्रवीण खंडेलवाल यांच्या मते, या सोहळ्यामुळे प्रयागराज आणि आसपासच्या भागातील व्यापार, रेल्वे, हवाई सेवा आणि रस्ते वाहतुकीला गती मिळणार आहे. दिल्लीहून प्रयागराज आणि आसपासच्या भार्गामध्ये सुमारे ४० हजार कोटींच्या माल आणि सेवांचा पुरवठा होईल. महाकुंभ २०२५ हा केवळ श्रद्धा आणि अध्यात्माचा केंद्रबिंदू नाही, तर भारताच्या सांस्कृतिक आणि आर्थिक ताकदीचे प्रतीक आहे.

एक भाविक सरासरी किती खर्च करणार?

एका अंदाजानुसार, महाकुंभात एका व्यक्तीकडून सरासरी ५ हजार खर्च केले जाऊ शकतात. प्रामुख्याने हॉटेल, धर्मशाळा, तात्पुरता निवास, भोजन, पूजेची साहित्ये, आरोग्य सेवा आणि इतर वस्तू व सेवांचा असेल. त्यामुळेच एकूण सोहळ्याची उलाढाल २ लाख कोटींच्या घरात जाऊ शकते.