मंगलपरिणय विवाह सूचक मंडळाचे वतीने अकोले येथे सर्वधर्मीय वधु वर मेळावा संपन्न!
अहमदनगर जिल्हासह नाशिक, मुंबई, पुणे ,संभाजीनगर, जळगाव येथील विवाह इच्छुकांनी मेळाव्याचा लाभ घेतला 700 पालक उपस्थित होते. २१० विवाह इच्छुक मुलामुलींनी सहभाग घेऊन नाव नोंदणी केली. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषदचे से.नि. उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप रुपवते, महाराष्ट्र राज्य से.नि. उप आयुक्त कृषी संचालक प्रवीण गवांदे, संगमनेर लघु पाटबंधारे विभाग उपकार्यकारी अभियंता इंजि.अरविंद जाधव, अकोले पशुसंवर्धन चिकित्सालय से.नि. सहाय्यक आयुक्त डॉ. विजय पवार, धुळे जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता प्रसाद डांगळे, से.नि.उप अभियंता अशोक धनंधरे, बँक ऑफ बडोदा से.नि.मॅनेजर आर.डी.आढाव या मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रमुख उपस्थितीत जेष्ठ बौद्धाचार्य व सामाजिक कार्यकर्तेए.पी. बनसोडे , सामाजिक कार्यकर्तेअरुण रुपवते, महाराष्ट्र शासन, समाज भूषण, महागायिका कल्पनाताई सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्तेभीमदास जगधने, अॅड.एस.व्ही.जाधव, कैलास जाधव या मान्यवरांनी शुभेच्छा विचारातून सामाजिक संदेश दिला. मंगल परिणय विवाह सूचक मंडळाचे संचालक भाऊसाहेब देठे यांचे कार्य वीस वर्षापासून मंडळात विवाह जमल्याचे अभिप्राय अनुभव काही मान्यवरांनी स्टेजवर सांगितले. नावनोंदणी झालेल्या मुला मुलीची स्टेजवर प्रत्येकी फॉर्म वाचून परिचय करून देण्यात आला. स्टेजवर पहाणी करून नंतर माहिती देऊन, घेऊन सायंकाळपर्यंत विवाह जुळण्यासाठी पालकांनी एकमेकांची भेट घेऊन चर्चा केली. एकंदरीत अनेक जणांचे विवाह जमतीलि असे चित्र दिसत होते. २१० मुला-मुलींनी या मेळव्यात नाव नोंदणी केली. मेळाव्याचे सुत्रसंचलन सुमधूर आवाजात व कविता सादर करत सुदेश जगताप यांनी केले. मेळावा यशस्वीतेसाठी अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.