अहमदनगर :
नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलय, त्यामध्ये लघुदाब वाहिनी, उच्चदाब वाहिनी, सर्विस कनेक्शन व सौर कृषीपंप याव्दारे वीज जोडणी देण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून राज्यभर सुमारे एक लाख कृषीपंप वीज जोडण्या दरवर्षी देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय. याच धोरणाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आज नगरमध्ये राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषद घेतलीय. या योजनेअंतर्गत सर्व कृषी ग्राहकांना तीन वर्षात टप्प्याटप्याने कायमस्वरूपी दिवसा 8 तास वीज पुरवठा करण्याचे नियोजन आहे.
कृषी फिडर व वितरण रोहित्रावरील मिटर अद्ययावत करणे इ. कामे करण्यात येणार आहेत. तसेच सध्या कार्यरत असणाऱ्या कृषीपंपाना कॅपॅसिटर बसविण्यात येणार आहेत. यासाठी पायाभुत सुविधांच्या खर्चापोटी शासनामार्फत दरवर्षी 1500 कोटी रुपये याप्रमाणे 2024 पर्यंत भागभांडवल स्वरूपात निधी महावितरण कंपनीला देण्याबाबत निर्णय घेण्यात आलाय. यावेळी शेतीपंपाची जी काय वसुली होईल त्यातील ६६ टक्के भाग त्याच भागात पायाभूत सुविधांवर खर्च केला जाईल अशी ग्वाही तनपुरे यांनी दिलीय. शेतकऱ्यांसाठी लोखण्डी डीपींविन ट्रान्सफॉर्मर यांसारख्या अनेक सुविधा या पैशातून करण्यात येणारअसल्याचे ते यावेळी म्हणालेत. यावेळी अधिक माहिती त्यांनी दिलीय.