आयएमएस तर्फे इव्हेंट मँनेजमेंटच्या चलचित्र फितीचे अनावरण

अधिक माहितीसाठी संपर्क क्र.९४२२०८१०९७ व ०२४१२३२४८३०

अहमदनगर :

व्यवस्थापन व तंत्रज्ञान बरोबरीनेच नवनवीन ज्ञान व संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आयएमएस सातत्याने नवनवीन उपक्रम राबवीत असते, म्हणूनच आजच्या बदलत्या काळात इव्हेंट मँनेजमेंट या अभ्यासक्रमावर  आधारित चलचित्र फीत संस्थेने  बनवली असून यातून युवकांना उद्योजक बनण्याची प्रेरणा निश्चित मिळेल असा विश्वास संस्थेचे संचालक  डॉ. एम.बी.मेहता यांनी व्यक्त केला.

आयएमएस संचलित इव्हेंट मँनेजमेंटच्या प्रोत्साहनपर (व्हिडीओ ) चलचित्र फितीचे अनावरण डॉ. एम.बी.मेहता यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रा, डॉ.विक्रम बार्नबस ,  इव्हेंट समन्वयक श्रद्धा गांधी,प्रा.ऋचा तांदूळवाडकर,विध्यार्थी उपस्थित होते.

यावेळी श्रद्धा गांधी म्हणाल्या की, इव्हेंट क्षेत्राकडे युवापिढीचे आकर्षण सतत वाढत आहे हे ओळखून संस्थेने हा  अभ्यासक्रम चार वर्षापूर्वी सुरु केला.आज पर्यंत एकून १२० विध्यार्थी प्रशिक्षत झाले ,सध्या नगर मध्ये इव्हेंट मँनेजमेंटच्या क्षेत्रात अनेकजण  कार्यरत आहेत व उत्तम व्यवसाय  करत आहेत.अशा विद्यार्थ्यांचे अनुभव, संस्थेचे कार्य व अभ्यासक्रमाची माहिती व्हावी या हेतूने तयार केलेली चलचित्र फीतीतून या क्षेत्राची माहिती होईल व अनेकांना या क्षेत्रात येण्यास  प्रेरित करेल असे त्यांनी सांगितले.

अभ्यासक्रम पूर्ण करून या क्षेत्रात कार्यरत समृद्धी शेटिया व पूजा माखीजा यांनी आपले  प्रशिक्षण काळातील अनुभव व सध्या करत असलेल्या व्यवसायाची माहिती दिली.

या अभ्यासक्रमातून कमी खर्चात उत्तम सजावट, सेवा कशी द्यावी. नेहमीच वेगळे विचार करून नाविन्यपूर्ण कल्पना राबवून ग्राहकांना समाधान देताना चौकटी च्या बाहेर जाऊन कार्य कसे करावे याचे ज्ञान दिले जाते. संस्थेतर्फे लवकरच येत्या डिसेंबर मध्ये इव्हेंट मँनेजमेंट अभ्यासक्रम सुरु होणार असून अधिक माहितीसाठी समन्वयक श्रद्धा गांधी ९४२२०८१०९७   व ०२४१२३२४८३० आयएमएस संस्थेत संपर्क साधावा .सर्व  उपस्थितांचे आभार हिमांशू चौरे याने मानले