मिरजगावात शॉर्टसर्किटमुळे बसने उभ्या उभ्या पेट घेतला
टेम्पोचालकाच्या प्रसंगावधानाने १६ प्रवाशांचे प्राण वाचले
मिरजगावात रस्त्यावर शुक्रवारी सकाळी नाशिकहून सोलापूरकडे धावणाऱ्या एसटी बसला काल अचानक आग लागली. बस सोलापूरकडे जाण्यासाठी निघाली. स्थानकातून बस निघाल्यावर काहीवेळेतच शॉर्टसर्किट होऊन बसच्या पुढील डाव्या बाजूला आग लागली. त्याच्यातुन जाळ व धूर बाहेर पडू लागला. मात्र बसचालकाच्या ही बाब लक्षात आली नाही. यात बस उभ्या उभ्या जळून खाक झाली. ही घटना दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. दुचाकीस्वार आणि टेम्पोचालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले. आग लागल्याचे समजताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. कारण दोन दिवसापूर्वीच जळगावात रेल्वेमध्ये आग लागल्याच्या पार्श्वभूमीवर काल मिरजगावात बसला आग लागल्याचे प्रवाश्याना समजताच त्यांनी बस तत्काळ मोकळी केली. मात्र या गोंधळात प्रवाश्याचे सामान मात्र बसमध्ये राहिले. त्यामुळे प्रवाश्याचें बॅग, चपला, बॅग, पिशव्या एसटीतच राहिल्या. पण ऐनवेळी दाखवलेल्या सतर्कतेमुळे अनेकांचे जीव वाचले कारण थोड्या वेळातच आगं भडकली आणि काही क्षणातच बस खाक झाली. या घटनेत कोणीही जीवितहानी झाली नाही. बसमध्ये वीस प्रवासी होते. यामध्ये महिला, मुले, वृद्ध प्रवासी यांचाही समावेश होता. अशी आग आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी कर्जत नगरपंचायतीच्या अग्निशमन वाहनाला पाचारण केले होते. मात्र चालक उपलब्ध नसल्याने अग्निशमन बंब उशिरा म्हणजे एसटी बस खाक झाल्यावर घटनास्थळी पोहोचला. बसमध्ये सोळा प्रवासी होते. काही मिनिटांतच पानटपरीजवळ बसलेले टेम्पोचालक अनिल लहाने बसला आडवे झाले. त्यांच्यासह खंडू करडुले, दत्ता सकट, संतोष कोरडे यांनी धाव घेत बसमधील प्रवाशांना बाहेर काढले.